बारामती प्रतिनिधी
फार्मसी क्षेत्रातील जीपीएटी व निपेर जी परिक्षेत माळेगाव येथील पल्लवी अशोक भोसले हिने उत्तुंग यश मिळवले आहे. पल्लवी भोसलेची उच्च शिक्षणासाठी मोहाली (पंजाब) येथे निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल कौतुकाचा वर्षांव होत आहे. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी शाखेत पल्लवी भोसले (माळेगाव) हि शिक्षण घेत होती. नुकतिच तिने देशपातळीवर फार्मसी क्षेत्रातील जीपीएटी व निपेर जी या कठिण समजल्या जाणा-या परिक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. या यशाच्या जोरावर मास्टर ऑफ फार्मसी (बायोटेक्नोलॉजी) या उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित अशा मोहाली (पंजाब) या निपेर संस्थेत तिची निवड झाली आहे. विशेष म्हणजे पल्लवी भोसले हिचे वडिल अशोक भोसले हे सर्व सामान्य शेतकरी आहेत. या यशाबद्दल शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सचिव प्रमोद शिंदे, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोसले,सरपंच जयदीप तावरे, उपसरपंच अजित तांबोळी यांनी पल्लवी भोसले हिचे अभिनंदन केले आहे.