इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
गेल्या २ - ३ दिवसांत अतिवृष्टीमुळे खुप मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी यांचे शेतीचे नुकसान झाले आहे व नदीकाठच्या गावांतील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे . अन्न धान्य याचे नुकसान झाले आहे, कित्येक जणांची महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून खराब झाली आहेत. कित्येक गावातील पाणी घरातून व वस्तीतून बाहेर निघावे म्हणून रस्ते फोडले आहेत , ते लवकरात लवकर दुरूस्त करावेत. व कळंब गावातील आंबेडकर काॅलनीतील घरामध्ये पावसाचे कित्येक वर्षे पाणी शिरत आहे, पण शासन दरबारी अर्ज केले तरी हि समस्या सोडवली जात नाही , त्यावेळी लोक संबंधित रस्ता फोडून पाणी बाहेर काढतात पण त्या रस्त्याकडेही इंदापूर तालुक्यातील मंत्री व आमदार आणि प्रशासनाचे यांकडे लक्ष जात नाही . नुकसानग्रस्त शेतकरी यांना एकरी प्रत्येकी २५००० रूपये व घरातील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १०००० रूपये द्यावेत, अशी मागणी इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके , उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे , शहराध्यक्ष हनुमंत कांबळे , प्रमोद चव्हाण , नाना बनसोडे आदी कार्यकर्त्यांनी केली आहे .