Type Here to Get Search Results !

शिवाजीनगर न्यायालयातून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या 'त्या' वकिलाचा खून, ३ संशयित अटकेत


मिलन शाह मुंबई

पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट उमेश मोरे हे १ ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक दिवस झाले तरी अद्याप त्यांचा तपास लागला नसल्यामुळे त्यांच्यासोबत नेमकं झालं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत होता.

परंतु आता बेपत्ता झालेले ॲड. उमेश मोरे यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे या तिघांना ताब्यात घेतले आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी उमेश मुळे यांचा शोध घेण्यासाठी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. यावेळी उमेश मोरे हे बेपत्ता झाल्याचा दिवशी त्यांच्या आसपास संशयास्पदरित्या दोन व्यक्ती दिसत होत्या. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी एक स्वतंत्र पथकही तयार करून तांत्रिक बाजूने तपास केला जात होता.

उमेश मोरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते.दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या लाच प्रकरणाच्या गुन्ह्यातील ते फिर्यादी होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूमिअभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती.

१ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते.न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मित्रांनाही ते भेटले. त्यानंतर पत्नीशी फोनवर बोलल्यानंतर घरी येतो असे त्यांनी सांगितले. परंतु रात्री नऊ वाजल्यानंतर ही ते परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test