पुणे प्रतिनिधी
काळेवाडीतील राजवाडेनगर, तापकीर मळा चौक
येथील कच-याच्या ढिगात आज बुधवार (दि. २८
ऑक्टोबर २०२०) नुकतेच दोन तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. पिपरी चिचवड महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी नितिन विठ्ठल सुर्यवंशी रा. काळेवाडी, पिपरी हे कामावर जात असताना त्यांना आज सकाळी ठिक ०६:३० वाजता हे अर्भक कचऱ्याच्या ढिगामध्ये आढळुन आले.
सदर स्त्री अर्भक जीवंत असुन त्यास काळेवाडीतील
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नढे, इरफान शेख, रोहित
कदम यांनी आरोग्य निरीक्षक श्री. वाटाडे साहेब यांच्या मदतीने पिपरी येथील जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन पुढील उपचार करण्यात आले आहे.
या अर्भकाची प्रकृती ठिक असून या अर्भकाच्या आईवडीलांचा तपास वाकड पोलिस करीत आहेत.