सोमेश्वरनगर प्रतिनिधी
शारदानगर बारामती येथील शेतीसह अन्य संशोधनात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यरत असलेल्या शारदा कृषी वाहिनी कम्युनिटी रेडिओच्या वतीने चांडाळ चौकडी च्या करामती या महाराष्ट्रातील अग्रगण्य वेबसिरीजचे सरपंच सुदाम नेवसे यांना नुकतेच निमंत्रित करण्यात आले होते. कोरणा आजारा संदर्भातील सुरक्षितता
बाळगण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात हा संदेश सुदाम नेवसे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आला. त्यांचा आवाज या वाहिनीच्या श्रोत्यांमध्ये गेल्या पाच दिवसात आवडीचा झाला
असून विविध जाहिराती संदेश प्रबोधनपर नाटिका यासाठी नेवसे यांना आगामी काळात ध्वनिमुद्रित साठी स्टुडिओमध्ये निमंत्रित केले जाईल असे कळविण्यात आले आहे.
यावेळी मुलाखतवजा चर्चेप्रसंगी शारदा कृषीवाहिनीचे केंद्र प्रमुख सुनिल शिरसीकर आणि निवेदक म्हणून दिपाली कोळसे, अनिता जाधव आणि स्वप्निल बुधावले उपस्थित होते.



