दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत सन 2020 ला सहकारी संस्था व शेतकरी उत्पादन कंपन्या तसेच शेतकरी गट यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर इको आरसीएफ या कंपनीचा खत पुरवठा सुरू आहे तसेच महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ सहकार विभाग व पुणे जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था ग्रामीण पुणे यांच्यामार्फत दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर येथिल विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित वडगाव दरेकर यांना महाराष्ट्रात प्रथमच आर सी एफ यूरीया चा पुरवठा करण्यात आला यावेळी दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाषराव नागवे दौंड खरेदी-विक्री संघाचे माझी चेअरमन वडगाव दरेकर विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन नितीन नागवे संपतराव कापसे सचिन नागवे तुकाराम अवचर सुनील नागवे विठ्ठल भगत महादेव जगताप सुदाम बाराते व सर्व शेतकरी वर्ग यांनी युरीया गाडीचे पूजन करण्यात आले यावेळी चेअरमन नितीन नागवे यांनी शेतकऱ्यांना ना नाफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांनी खरेदी करावे अशी विनंती करण्यात आली



