दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
देऊळगावराजे मधून जाणार अष्टविनायक महामार्ग यामुळे गावातील वर्षानुवर्षे असणारे अतिक्रमण हटविण्यात आले आहे त्यामुळे या मुख्य रस्ते अखेर मोकळा श्वास घेतला आहे देऊळगावराजे गावातून दौंड सिद्धटेक रस्ता हा मुख्य रस्ता आहे पण दरवेळी या रस्त्यावर अतिक्रमण होत चालेले होते त्यामुळे गावातील दर बुधवारी आडवड्यात बाजारामुळे मोठी गर्दी होत होती आणि त्याच बरोबर पुणे नगर जिल्ह्यातून अनेक भाविक सिद्धटेक येथे सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येत त्याबरोबर दौंड तालुक्यातील पूर्वभागात दौंड शुगर साखर कारखाना असल्यामुळे याची ऊस वाहतूक याच रस्त्यावरून करण्यात येत आहे या सगळ्या गोष्टी च्या विचार करता त्यामुळे गावातील रस्त्यावरील या अतिक्रमण मुळे प्रवास वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण निर्माण होत होती पण आता अष्टविनायक महामार्गाचे रस्त्याचे काम चालू झाले त्या रस्ता मोठा असल्यामुळे रस्त्याचे कडेचे पूर्ण अतिक्रमण काढण्यात आले आहे या साठी गावातील ग्रामस्थांनी सुद्धा मोठे सहकार्य केले
गावातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या 2001साली प्रयत्न केला होता पण शासनाने मला ऐनवेळी पोलीस बंदोबस्त नाकारण्यात आल्यामुळे मला अतिक्रमण काढण्यात यश आले नाही पण आता अष्टविनायक महामार्ग मुळे गावातील अतिक्रमण काढण्यात आले .
माजी सरपंच सुरेश कुंभार