सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मु सा काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमप्रसाद राजाराम केंजळे रा करंजे ता बारामती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवार दि २५ रोजी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्यात पत्नी सुजाता केंजळे एक विवाहित मुलगा संकेत तसेच असा परिवार असून डॉ नितीन केंजळे यांचे ते मोठे बंधू होत.त्यांच्या जाण्याने सोमेश्वरनगर परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.