सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मुरुम(ता. बारामती) ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हभप,पंढरीनाथ शंकरराव चव्हाण(वय, ६५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात् पत्नी, दोन भाऊ, बहीण, पुतणे असा परीवार आहे. कीर्तन आणि प्रवचनकार म्हणून ते राज्यात प्रसिध्द होते. साळोबावस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने सोमेश्वरनगर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.