सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वरनगर परिसरात आठ दिवसापासून पावस बंद झाला होता त्यामुळे परिसरातील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले होते त्याचे कारण त्याना अजून काही दिवस पावसाची विश्राती अपेक्षित होती त्यामुळे शेतातील व इतर कामांना चंगला जोर वाढला होता ...परुंतु शुक्रवारी दि २३ ला रात्री नऊ ला सुरू झालेल्या पावसाने शेतातील कामे खोळंबणार खोळंबली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे मत व्यक्त केले आहे.
गेले आठ दिवसापासून च वातावरणात उकाडा प्रचंड होता .आत्ता चालू असलेल्या पावसाने वातावरणात चांगलाच गारवा असून आभाळाची काळोखी पहता रात्रीचा पाऊस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
शेतातील उभ्या पिकांवर फारसा परिणाम होणार नाही परंतु काही दिवसांपूर्वी लागवड केलेल्या तरकारी पिके साचलेल्या पाण्याने नसणार आहे व यांची आर्थिक झळ मात्र शेतकऱ्यांच्या माथी पडणार आहे.
24 ऑक्टोबर 2020 :पर्जन्यवृष्टी 70 मिमी असल्याची माहिती एम ए सी एस-आघारकर संशोधन केंद्र होळ-सोरटेवाडी (ता बारामती) येथील प्रक्षेत्र प्रभारी अजित चव्हाण यांनी दिली.