दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
पदोनत्ती मध्ये मागासवर्गीयांना आरक्षणसह महाराष्ट्र्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या विविध मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधात दि .३०ऑक्टोबर ते३नोव्हेबेर दरम्यान नागपूर दीक्षाभूमी ते मुख्यमंत्री निवास वर्षा बंगला (मुंबई)आरक्षण बचाव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारदरबारी मागासवर्गीयांची दखल घेण्यासाठी कोणाकडे वेळ नाही.राज्य शासनातील आरक्षण विरोधी अधिकारी गट आरक्षण विरोधी काम करीत आहेत,हजारो मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी पदोनत्ती पासून वंचित आहेत.काही कर्मचारी तर पदोन्नती विना सेवानिवृत्त झाले.सदर अन्यायाविरोधात महासंघाने संघर्षांची भूमिका घेतली आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयन्त केला पण कधीच होऊ शकला नाही, 'साहेब बाहेर गेले आहेत 'नंतर फोन करा अशी उत्तरे दिली जात आहेत. सदर बाबीत सामाजिक न्याय मंत्र्यानकडुन न्याय दिला जाऊ शकत नाही ही दुर्दैवी बाब आहे, अनेक मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती देखील मिळत नाही,म्हणूनच महसंघाच्या वतीने आरक्षण बचाव लढा तीव्र करण्यात येणार आहे.सर्वोच न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रभावाने पदोनत्ती आरक्षण लागू करावे.महाराष्ट्रातील चार लाखांच्या वर असलेला रिक्त पदे त्वरित भरावी,सुशिक्षित तरुण बेरोजगारांना त्वरित न्याय द्यावा अशा विविध मागण्या कांबळे यांनी या वेळी केल्या.
या वेळी दौंड तालुका अध्यक्ष हौशीराम गायकवाड, दादा डाळिंबे,विनायक कांबळे आणि संघटनेचे विविध पदाधिकारी या वेळी उपस्थितीत होते.