Type Here to Get Search Results !

बारामती तालुका कृषी पदवीधर संघटनेच्यावतीने बारामतीच्या तहसीलदारांना निवेदन


सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

कृषी विभागाशी संबंधित असणारी इ परवाना साईट लवकरात लवकर सुरू करावी व कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी बारामती तालुका कृषी पदवीधर संघटनेच्यावतीने बारामतीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
   कृषी पदविका संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश कडूस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्याच्या युवक उपाध्यक्षा पूर्वा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे निवेदन प्रशासकीय भवनात जाऊन दिले.
  सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कृषी विभागाशी संबंधित असलेले ई-परवाना केंद्राचे नूतनीकरण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नूतनीकरणाच्या साईट बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना व ई-परवाना केंद्र चालवणाऱ्या युवकांना मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने अशा केंद्रांचे तात्काळ नूतनीकरण करावे अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय अतिशय दुर्दैवी असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात बसणार असल्याने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी कृषी पदवीधर संघटनेच्या युवक उपाध्यक्षा पूर्वा जाधव, कार्याध्यक्षा मृणाल तावरे, सचिव सिद्धी वाघमोडे उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test