Type Here to Get Search Results !

दौंड शुगर कारखाना यावर्षी शेतकरी यांची दिवाळी करणार गोड


दौंड प्रतिनिधी राहुल आवचर

आलेगाव ता दौंड  येथील दौड शुगर कारखान्याने 12 व्या गळीत हंगामाचा बॉयलर आणि गळीत हंगामाचा शुभारंभ कारखाण्याचे चेअरमन जगदीश कदम, सुनेत्रा पवार ,संचालक वीरधवल जगदाळे आणि त्यांच्या संगीता जगदाळे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी चेअरमन कदम यांनी आपण शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे सांगितले पन रक्कम किती देणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. करखान्याने गत वर्षीच्या उसाला २७००रुपये या पूर्वी दर दिला असून एफआरपी नुसार अजुन शेतकऱ्यांना १०रुपये देणे बाकी आहेत पन या  दहा रूपयात अजुन कहिका होईना वाढ करुन शेतकऱ्यांना ही रक्कम दिवाळीपुर्वी खात्यावर अदा केली जाईल असा विश्वास कदम यांनी या वेळी दिला.

यंदाच्या  गळीत हंगाम सन 2020/21 मध्ये अकरा लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे कारखान्याचे उद्धिष्ट 

कारखान्याने  ठेवले असुन कारखान्याच्याते या वर्षी नक्कीच पूर्ण केले जाईल असे संचालक विरधवल जगदाळे यांनी सांगितले.                                                                       कारख्यान्याने १२व्या गळीत हंगामाची तयारी केली असुन मशिनरीची आँईलिंगची कामे वेळेत पूर्ण केले जातील, गळीत हंगामाकरीता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७लाख टन उस उपलब्धअसून उर्वरित उस बाहेरच्या तालुक्यात मुबलक प्रमाणात या वर्षी उपलब्ध आहे.तसेच गत वर्षी गाळप झालेल्या उसाची सरासरी रिकवरी ११.६०%असून या वर्षी सुद्धा चांगला बाजारभाव दिला जाईल असा विश्वास पूर्ण वेळ संचालक शहाजी गायकवाड़ यांनी दिला. 

             कारखान्यामार्फत शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असुन ठिंबक सिंचन सारख्या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे अवाहन करण्यात आले.दौंड तालुक्यातील सर्व ऊसाचे गाळप  कारखान्यामार्फत करण्याचे नियोजन केले आहे.आपला ऊस दौंड शुगर कारखान्याकडे गाळपास पाठविण्यासाठी राखुन ठेवावा असे आवाहन जगदाळे यांनी केले. या कार्यक्रमाला इंद्रजीत जगदाळे,दत्तात्रय पाचपुते, सुभाष नागवे, अमित गिरमकर, भानुदास औताड़े,  कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक शहाजी गायकवाड ,पी एम जोशी,जंगम वाघ,शशिकांत गिरमकर ,संदेश बेनके,विजयकुमार सावरीकर,दिपक वाघ,पी एस काळे,अधिकारी वर्ग, कर्मचारी ,उस उत्पादक, ग्रामस्थ ऊपस्थित होते,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test