Type Here to Get Search Results !

भिगवण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या रस्ता रोकोत राजवर्धन पाटील यांचा सहभाग


इंदापूर प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

भिगवण ( ता. इंदापूर  ) येथे पुणे- सोलापूर रस्त्यावर रविवार,  दि. ४ रोजी मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज , इंदापूर तालुक्याच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या संदर्भात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवा नेते राजवर्धन पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. 

यावेळी त्यांनी सांगितले कि, मी देखील समाजाचा एक घटक म्हणून, समाजाच्या हितासाठी सदैव आपल्या सोबत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन, सरकारच्या विरोधात आवाज उठवून समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी मराठा युवकांशी संवाद साधताना व्यक्त केला . मराठा समाजाच्या हक्कासाठी व न्याय मागण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test