Type Here to Get Search Results !

दौंड तालुक्याच्या पूर्वभागात इंद्रायणी तांदुळाचे उत्पादन अधिक


दौंड प्रतिनिधी राहुल आवचर

दौंड तालुक्याचा पूर्वभाग तसा पूर्वीपासुन सुजलामसुफलाम १९८० साली उजनी धरण झाले आणि दौंड पासून वाटलुज नायगांव पर्यत उजनी धरणाचे बॅक वॉटर मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले, पाणी मुबलक असल्यामुळे हा सर्व परिसर उस पिकाचे आगार म्हणून ओळखला जाऊ लागला. पण सतत उस पिक करुण करुण शेतीला अतिरिक्त पाणी दिले जाऊ लागले, परिणामी आता परिसरातील बरीच शेती अतिरिक्त पाण्याने खराब शारपड झाली, परिणामी येथील उसाचे एकरी उत्पादन कमी झाले, पण यातून परिसरातील शेतकऱ्यांनी या वर्षी नवीन पर्याय शोधून काढला आहे, या वर्षी या भागात वडगावदरेकर आणि पेड़गाव(ता. दौंड)या दोन गावात मिळून शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे, विशेष म्हणजे ज्या शेतात पाउसामुळे अतिरिक्त पाणी साचते या शेतात हे पिक खुप चांगले आले आहे. या दोन गावात मिळूनजवळपास३०-३५एकरावर  तांदूळ पिक घेतले आहे.कोकन आणि आडमाळ  सारखे खुप चांगले पिक या ठिकाणी आले आहे, त्यामुळे ही पुढील बदलाची नांदी तर नाही ना असा प्रश्न पडला तर नवल वाटायला नको..पुढील काळात हा  भाग तांडळाचे आगार म्हणून ओळखला जाऊ शकतो.

तांदूळ पिकाला जास्त पाणी आणि हवेत आद्रतेचे प्रमाण जास्त लागते, या वर्षी या भागात मुबलक पाऊस झाला परिणामी भात पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने पिक अंत्यत जोमात आले आहे. हे पिक चार महिन्याचे असून याच शेतात भात पिक निघुन उस पिक सुद्धा होउ शकते, परिणामी शेतात पिक फेरपालट होऊन उस पिक सुद्धा चांगले होऊ शकते. त्यामुळे पुढील काळात परिसरात भात पिक मुबलक प्रमाणात होणार आहे यात काही शंका नाही.

मि माझ्या शेतात या वर्षी पाच एकर तांदूळ पिकाची लागवड केली असून एकरी आठ दहा हजार खर्च झाला असून एकरी ८०ते ९०हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

सुभाष नागवे-तांदूळ उत्पादक शेतकरी.

 उस पिकाला पर्यायी तांदळाचे पिक या भागात चांगला पर्याय पुढील काळात होऊ शकते,आणि शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावे 

के. ए.काझडे -कृषी सहाय्यक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test