Type Here to Get Search Results !

बारामती येथील भरणेमोटर्सच्या वतीने गौरी गणपती सजावट व वक्तृत्व स्पर्धकांचा सन्मान

सुपे प्रतिनिधी   
             
भरणे मोटर्स बारामती येथे राज्यमंत्री नामदार दत्तामामा भरणे व्हॉटसअॅप ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२० या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडला. या आॅनलाईन स्पर्धेत एकूण १९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता एकुण १८ विजेत्याची परीक्षकांनी निवड केलेली होती. 
या कार्यक्रमावेळी भरणे मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी आलेल्या स्पर्धकांची टेमप्रेचर व अॅक्सिमीटर तपासुनच आतमध्ये प्रवेश दिला. या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १८ विजेत्यांना सन्मान चिन्ह व एकूण ३०,००० रु  रोख रकमेची बक्षिसे दिली . या कार्यक्रमाचे आैचित्य साधुन उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या वाढदिवसा निमित्ताने अजित योध्दा वक्तृत्व स्पर्धेचे मानकरी साई  तात्याराम बनसोडे यांना स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले. आपल्या भाषणात सर्व स्पर्धकांना व प्रेक्षकांना कोवीड-१९ चे महत्व पटवून दिले. काळजी घ्या. काळजी करू नका असाही अनमोल संदेश दिला हा स्तुत्य उपक्रम स्पर्धा नागरिकांना त्यांच्या कलागुणांना वाव देणारा आहे. असेही स्पष्ट केले. 
आयोजक भरणे मोटर्स यांच्या वतीने सर्व मान्यवर व स्पर्धक यांना स्नेहभोजन  व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून लाभलेले भरणे मोटर्सचे सर्वेसर्वा अभिजित भरणे, अनिकेत भरणे, अंबादास लांडगे, महेश बोराटे आदी यावेळी उपस्थित होते  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बनसोडे सर यांनी केले, तर आभार महेश बोराटे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test