Type Here to Get Search Results !

मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार सुरेखा महाडिक यांचे दुःख निधन




विशेष प्रतिनिधी मुंबई

कोरोना संकट काळात कोरोनाची (कोविड-१९) लागण झालेल्या महिला पोलीस शिपाई सुरेखा महाडिक(सुरेखा प्रशांत उनावकर) यांना दि. ११ आॅक्टोबर २०२० रोजी वीरमरण आले. त्या ४० वर्षांच्या होत्या. 
    सन २००१ साली मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या पोलीस शिपाई सुरेखा महाडिक या विशेष शाखा - २ (एसबी - २) येथे कर्तव्याला होत्या. सद्या त्या मुंबई विमानतळ येथे कर्तव्य बजावत होत्या. गेल्या ८ दिवसांपूर्वी त्यांना अचानक त्रास होऊ  लागल्याने सुरेखा महाडिक यांनी कोरोनाची चाचणी केली. कोविड-१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न होताच सुरेखा महाडिक या ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील वैद्य रुग्णालयात दाखल झाल्या. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. अखेर उपचारादरम्यान त्यांचा ११ ऑक्टोबर रोजी त्यांना वीरमरण आले.
    आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे मुंबई पोलीस खात्यात स्वत:ची विशेष ओळख असलेल्या पोलीस शिपाई सुरेखा महाडिक यांचे निधन झाल्याची माहिती सोशल मीडियावर वायरल होताच अनेकांना धक्का बसला. सुरेखा महाडिक यांच्या रूपात एक कर्तव्य दक्ष सहकारी गमावल्याने पोलीस खात्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला. 
    या दु:खातून सावरण्यासाठी महाडिक व उनावकर कुटुंबीयांना व त्यांच्या सहकाऱ्यांना, मित्रमंडळींना बळ मिळो, हीच "सतर्क पोलीस टाईम्स" परिवाराकडून प्रार्थनाही करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test