Type Here to Get Search Results !

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते घोगरे - पाटील अॅग्रो एंटरप्रायझेसचा उदघाटन सोहळा संपन्न

 
इंदापूर प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

गुरुवार, दि.८ आक्टोंबर २०२० रोजी बावडा येथे घोगरे - पाटील परिवाराने सुरू केलेल्या ' घोगरे - पाटील अॅग्रो एंटरप्रायझेस ' या नवीन दुकानाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. 

बावडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष महादेव घोगरे यांचे चिरंजीव महावीर सुभाष घोगरे हे उच्चशिक्षित असून सध्या ते स्टेट हेड  ( महाराष्ट्र व मध्य प्रदेश ) या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे बंधू  रत्नाकर सुभाष घोगरे हे शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. घोगरे - पाटील परिवाराने बावडा आणि पंचक्रोशीतील शेती व्यवसायाची गरज लक्षात घेऊन उभारलेला हा व्यवसाय सर्वांचीच भरभराटी करणारा आहे. याव्यवसामुळे अनेकांना रोजगार निर्माण होतील व विविध मार्गांनी आर्थिक संपन्नता निर्माण होईल , असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त करून व्यवसायीक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या उदघाटन प्रसंगी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे आणि जेष्ठ नेते अशोक घोगरे व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test