बारामती प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी, एक गावठी पिस्टल अग्निशस्त्र व ३
जिवंत काडतुस बाळगणरा आरोपी जेरबंद .
मा.पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती
मिळाली होती की ,इसम नामे गणेश काशीद रा. मेडद ता बारामती जि पुणे याचेकडे देशी बनावटीचे
गावठी पिस्टल आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस
निरीक्षक लंगुटे व त्यांचे पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लंगुटे व
त्यांचे पथकाने दोन दिवस रात्र गणेश काशिद याच्यावर वेशांतर करून पाळत ठेवली. तो मेडद
गावातील भैरवनाथ पेट्रोल पम्पासमोर,मेडद ता बारामती जि पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर
पोलीस पथक सदर ठिकाणी पोहचले असता तो पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच पळून जावू लागला.पोलीस पथकाने त्यास पाठलाग करून पकडून त्याची अंग झडती घेतली असता त्यांचे कंबरेला डाव्या बाजुस एक गावठी
बनावटीचे पिस्टल अग्नीशस्त्र मिळुन आले. सदर पिस्टल अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांने परवाना नसल्याबाबत सांगितले. त्यामुळे त्याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाणे गु.र.क ६२८/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम
३(२५) सह २७ अन्वये गुन्हा नोंद करून त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,अप्पर पोलीस
अधिक्षक मिलींद मोहिते ,उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.नि.आण्णासाहेब घोलप,सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,सहा.फौजदार दिलीप सोनवणे,पोलीस
कॉन्टेबल नंदू जाधव,विनोद लोखंडे,मंगेश कांबळे,प्रंशात राउत, संतोष मखरे यांनी कामगिरी केलेली आहे.