Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र नरसिंहपूर येथील महापुराची हर्षवर्धन पाटील यांचेकडून पाहणी


इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

             श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील महापुराची भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.१५) पाहणी केली . यावेळी त्यांनी नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला .

                 या भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला व सर्वतोपरी सहकार्य केले जाईल , अशी ग्वाही दिली . घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरलेल्या ग्रामस्थांना व  दुकानदारांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी . तसेच भीमा व नीरेच्या पुराने पाण्याखाली गेलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे . त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही तातडीने नुकसानभरपाई द्यावी , अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली .

            दरम्यान , गुरुवारी दिवसभरात पुणे जि.प. सदस्या कु.अंकिता पाटील तसेच नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनीही श्रीक्षेत्र निरा नरसिंहपूरला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली व अडचणी कळात आम्ही तुमच्या बरोबर आहोत , अशी ग्वाही दिली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test