सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सामाजिक कार्याची व वेळोवेळी झालेल्या धनगर आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग या कामाची दखल घेत धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्रात राज्य संस्थापक अध्यक्ष मा श्री सखाराम बोबडे पडेगावकर तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महादेव बुट्टे व अमोल बोह्राडे अध्यक्ष पुणे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बापुराव लकडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष या पदी निवड करण्यात आली निवडी नंतर बापुराव लकडे यांनी येणारया काळात सदैव समाजासाठी काम करणार असुन समाजाच्या अडचणीसाठी रस्त्यावर उतरून काम करणार असुन धनगर आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग राहिल असा शब्द दिला
त्यांच्या या निवडीसाठी सोशल मिडीयाद्वारे परभणी लोकसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर तसेच अमोल बोह्राडे व महादेव बुट्टे, अंकुश लकडे (सरपंच )सचिन कोरडे ,अमोल धायगुडे, बापुराव महार्नवर तुषार गडदरे, बाळासाहेब महार्नवर,रोहन लकडे, या मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या



