Type Here to Get Search Results !

कृषी विध्याकाच्या समर्थनार्थसाठी आपल्या ट्रॅक्टरसह वरवंड येथे उपस्थित रहावे : वासुदेव काळे

दौंड प्रतिनिधी राहुल आवचर 

मागील सहा वर्षामध्ये देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येणा - या  भविष्याचा वेद घेऊन अत्यंत महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले यामध्ये गोरगरिब , आदिवासी , मागासवर्गीय , महिला , सैनिक , शेतकरी , युवक , व्यापारी , व्यावसायिक अशा सर्व घटकांना केंद्रस्थानी धरून विकासाची गंगा थेट समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याचा भागीरथ प्रयत्न.मोदीजी करताना आपण सर्व जण पहातोय . मोर्दीनी भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर अत्युच्च करण्याचे काम केलेले आहे.शेतकऱ्यासाठी वार्षिक ६ हजार रूपये पी.एम.किसान व्दारे , शेतकऱ्याच्या खात्यात जमा . किसान क्रेडिट व्दारे १ लाख ६० हजार चे विना तारण कर्ज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध.पिकविमा पध्दतीत अमुलाग्र बदल , बटाटा , कांदा , जीवनाश्यक वस्तुमधुन वगळे , निमकोटेड युरियाच्या माध्यमातुन काळा बाजार संपवणे , १२ रूपये मध्ये २ लाख विमा जनधन खाती , ग्रामिण भागातील महिलांना उज्वला गॅस मोफत जोडणी , उसाची विक्रमी ( FRP ) मंजुर करणे , नदी जोड प्रकल्प , साठवण गोदाम , सितगृह उभारणीसाठी मोठे अनुदान , प्रक्रिया उद्योगास अनुदानपर प्रोत्साहन , केंद्रीय पशु संवर्धन योजना लागु कांदा साठवण चाळीसाठी विशेष अनुदान वनौषधी लागवड , बाबु लागवड व त्यात मोठया प्रमाणात होत असलेले अडथाळे दुर करून बाबुच्या वृक्षाचा दर्जा काढुन गवत गटामध्ये गणती त्यामुळे बांधकाम व्यवसायातील वापरात वृध्दी , देशामध्ये १० हजार शेतकरी उत्पादक गटांची स्थापनेस मंजुरी देऊन सभासदांनी उभे केलेल्या भांडवला एवढीच गुंतवणुक केंद्र सरकार करणार व त्या गटांना २ कोटी पर्यंत विना तारण कर्ज देण्याची तरतुद . हे वरील व या सह अनेक शेतकरी हितांचे निर्णय मा.मोदीनी घेण्याचा सपाटा चालु असतानाच नुकतीच कृषी विधेयकांना लोकसभेत मंजुरी दिली.सदरची विधेयके शेतकऱ्यांना देशाअंतर्गत स्पर्धात्मक बाजारपेठेशी जोडण्याचा निर्णय झाला.शेतकरी स्वांतत्र्यानंतर ७० वर्षानी सर्व प्रकारच्या जोखडातुन मुक्त करण्याचे काम मोदींनी केले . परंतु विरोधी पक्षांना हे सहन होत नसल्याने त्यांनी पुन्हा दलालांची दलाली करण्याचे धोरण अवलंबिले व या विधयेकांना विरोध सुरू केला या विरोधकांनी एवढी खालची पातळी गाठली की मागील आठवडयामध्ये दिल्ली गेट येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क ट्रॅक्टर जाळण्याचे काम केले . म्हणून आपण आपल्या संस्कृतीमध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या बैलांची पुजा करतो , शेती अवजारांची पुजा करतो सध्या बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली याचा अर्थच असा आहे की आपण बळीराजाची देवता असलेले बैल , ट्रॅक्टरची पुजन गावो गावी करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतल्याने आज महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने बळीराजा सन्मान , ट्रॅक्टर पुजन व भव्य रॅलीचे आयोजन सोमवार 12 रोजी वरवंड ते केडगाव चौफुला दरम्यान रॅलीचे आयोजन केलेले आहे व समारोप चौफुला येथे होणार आहे . यासाठी मा.चंद्रकांतदादा पाटील ( भाजपा प्रदेश अध्यक्ष ) , डॉ.अनिल बोंडे ( भाजपा प्रदेश अध्यक्ष , किसान मोर्चा ) , आ.सुजितसिंह ठाकुर , आ.राहुल कुल , गणेश भेगडे , मा.आ.हर्षवर्धन पाटील , मकरंद कोरडे , सुधीर दिवे , आनंदराव राऊत , धर्मेंद्र खांडरे हे उपस्थितीत राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test