Type Here to Get Search Results !

मृत शिक्षकांच्या वारसांना इंदापूर शिक्षक पतसंस्थेची २० लाखांची मदत

इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

कोरोनामुळे निधन झालेल्या शिक्षकांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था उभी राहिली असून इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेने आपल्या शिक्षक सभासदांसाठी असलेल्या शिक्षक कल्याण निधीतुन संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता संतोष खुटाळे यांना व सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा सोपान कांबळे यांना प्रत्येकी १० लाख रुपयेचा धनादेश दिला आहे . 

शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ , उपसभापती वसंत फलफले यांचे हस्ते व माजी सभापती किरण म्हेत्रे , माजी सभापती संभाजी काळे , माजी सभापती सुनिल शिंदे , माजी सभापती विलास शिंदे , माजी उपसभापती दत्तात्रय ठोंबरे , संचालक आदिनाथ धायगुडे , संचालक बालाजी कलवले , तज्ज्ञ संचालक सुनिल चव्हाण,सचिव संजय लोहार , माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे , शिक्षक समितीचे नेते मोहन भगत , प्रविण धाईंजे , प्रताप शिरसट , शिक्षक नेते सयाजी येवले , सदाशिव रणदिवे यांचे उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला .

इंदापूर शिक्षक सहकारी पतसंस्था सदैव आपल्या शिक्षक सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते . संस्थेचे सर्व सभासदांचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला आहे.तसेच शिक्षक सभासदाचे कोणत्याही कारणाने निधन झालेस त्या शिक्षकांच्या कायदेशीर वारसास शिक्षक कल्याण निधीतुन १० लाखांची मदत तात्काळ व तत्परतेने दिली जाते . या मदतीमुळे शिक्षक कुटूंबास मोठा आर्थिक आधार मिळत असल्याने सभासदांमधुन समाधान व्यक्त केले जाते.शिक्षक कल्याण निधीतुन शिक्षक सभासदांना विविध आजारासाठी तात्काळ ५० हजारांची मदत दिली जाते .
इंदापूर तालुक्यातील संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचा कोरोनाने काही दिवसांपूर्वी निधन झाले होते . त्यांच्या पाश्चात्त्य पथसंस्थेने दिलेल्या मदतीबद्दल खुटाळे व कांबळे कुटुंबातील सदस्यांनी संस्थेच्या संचालक मंडळ व सभासदांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test