मोरगांव प्रतिनिधी
मोरगाव ता . बारामती नजीक असलेल्या शेराचीवस्ती येथे एका सावत्र बापाने नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. खुद्द बापानेच अत्याचार केलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून , वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मोरगांव -निरा रस्त्यालगत शेराचीवस्ती येथे बाहेरगावावरून आलेले एक कुटुंब राहत आहे . संबंधीत मुलीच्या आईने म्हणजे तक्रारदार महीलेचा पहीला पतीचे निधन झाल्यानंतर तिने दुसरे लग्न केले . पहील्या पतीच्या दोन अपत्यासह महीला राहत होती. पैकी नऊ वर्षाच्या मुलीवर सावत्र बाप असलेला आरोपी रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (मुळगाव बोकणगाव ता . जि . लातुर ) याची वाईट नजर होती . मंगळवार दि ६ रोजी घरात पत्नी नसल्याचे पाहुन आरोपीने नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला . तसेच कोणालाही न सांगण्याबाबत धमकावले .
यामुळे पिडीत मुलगी जेजुरी येथे आपल्या आजोळी गेली . आजोळी मुलीने घडलेली सर्व हकीकत सांगीतली . घरात मुलगी नसल्याचे पाहून विचारणा केली असता महीलेचा पती निरुत्तर झाला .दुसऱ्या दिवशी महील्याच्या माहेरी दोघे पती -पत्नी गेले असता . आरोपी रंगनाथ घरात न येता घरापासून दुर अंतरावर थांबला होता .मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगीतल्यामुळे काल दि ८ रोजी रात्री नऊ वाजता वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती .
त्याच्या विरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण , अनुसुचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संबंधीत चिमुरडीवर अत्याचात घडल्याची माहीती समजताच मोरगाव भागातुन तिव्र संतापाची लाट उसळली असुन आरोपी कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे .
या घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सूचनेनुसार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे व पोलीस हवालदार संजय मोहिते यांनी काही मिनिटातच आरोपी सावत्र बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत .घटनेची माहीती समजताच पोलीस पाटील नयना नेवसे यांनी घटनास्थळी भेट दिली . तालुक्यात या घटनेचा निषेध केला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.



