पुणे प्रतिनिधी
खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेवराव गोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. 55 वर्षीय गोरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.त्यांच्यावर महिन्याभरापासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुरेश गोरे हे चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते. तसंच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं. खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून त्यांनी 2014 मध्ये आमदारकीचीनिवडणूक लढवली होती. त्यात गोरे यांनी विजय मिळवला होता. 2014 ते 2019 या काळात ते आमदार होते.



