१) तरडोली ता . बारामती हिम्मत भोसले यांच्या शेतातील पपईचे झालेले नुकसान
२) पोल्ट्रीतील मेलेल्या कोंबड्या
मोरगाव प्रतिनिधी
सलग पडलेल्या पावसामुळे तरडोली ता .बारामती येथील शेतकरी हिम्मत विठ्ठलराव भोसले यांच्या अडीच एकर शेतातील पपईची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बारामती येथील कृषी विज्ञान क्रेंदाकडुन येथील शेतकरी भोसले यांनी ग्रीनबेरी जातीची झाडे घेतली होती . मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भोसले यांच्या अडीच एकर जमीनीवरील पपईचे झाडे जमीनदोस्त झाली आहे .याचबरोबर पोल्ट्रीतील तीनशे गावरान कोंबड्या मृत पावल्या आहेत.
पपईच्या झाडांना मोठा खर्च करुनही हाती काहीच येणार नसल्याने येथील शेतकऱ्यांस कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे .गेल्या वर्षीही या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते . सलग दोन दोन वर्षे नुकसान होत असल्याने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.पपईच्या नुकसानीबाबत येथील गाव कामगार तलाठी श्याम झोडगे तर कोंबड्यांच्या नुकसानीची पाहणी पशूवैद्यकीय अधीकारी गावडे यांनी केली.