सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील मुख्य दुकानलाइन मध्ये असणारे जवाहरलाल राजीव शहा अँड सन्स नावाचे असलेले दुकान व चुलते संतोष जवाहरलाल शहा यांचे साई ट्रेडर्स नावाचे किरण मालाचे दुकान यातील अज्ञात चोरट्याने १७/१०/२०२० रोजी ११:३० वा ते दि १८/१०/२०२० रोजी स ७:०० वा कडीकोयंडा तोडून त्या दुकान प्रवेश करून आतील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील लोकर मधील १,५०,०००/- रू व चुलते संतोष शहा यांचे दुकानातील गल्ल्यात ठेवलेले ८,८००/- रु असे एकूण मिळून रोख रक्कम रुपये १,५८,८००/- रु ची घरफोडी चोरी केली असल्याची सौरभ सुधीर शहा यांनी फिर्याद दिल्याने पोलीस नाईक काशीनाथ नागराळे यांनी गुन्हा दाखल करत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे करीत आहेत.