महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसुआई शिखरावर लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या साठ सदस्यांनी सुमारे 321 फुट लांबीच्या तिरंगा ध्वजा द्वारे महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना मानवंदना देत आगळा वेगळा उपक्रम केला. डोंगर ग्रुपच्या वय वर्ष 5 ते वय वर्ष 65 वयोगटातील सर्व साठ सदस्यांनी कळसुआई शिखर यशस्वी सर केले . डोंगर ग्रुपच्या तिरंग्यातुन महाराष्ट्र सर्वोच शिखरावर साकारण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मीटर उंचीचे कळसुआई शिखर मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहीमे मध्ये साठ सदस्य सहभागी झाले होते.
या मोहीमेचा शुभारंभ नगराध्यक्ष सचिन शेळके, सुरेश जाडकर, पो . नि. राजेंद्र शेळके, सपोनि संतोष चौधरी , शामसुंदर डोईफोडे, विनय रावखंडे , विठ्ठल टेंगले ,यांचे हस्ते श्रीफळ वाढऊन करण्यात आला.
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असणाऱ्या अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील कळसुआई शिखरावर 321 फुट तिरंगा झेंड्याद्वारे महाराष्ट्राचा नकाशा करण्याची कलपणा डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शेळके , हेमंत निंबाळकर, डॉ. अविनाश शेळके , सहदेव गोरड, शंभूराज भोसले, वरूण क्षीरसागर, रविद्र धायगुडे यांच्या सहकार्याने हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
डोंगर ग्रुपच्या साठ सदस्यांनी पहाटे दोन ,तीन, चार वाजता तीन ग्रुपमध्ये कळसुआई शिखर सर करण्यास सुरुवात केली . सर्व साठ सदस्यांनी शिखर दिड ते तीन तासात सर केले.321 फुट लांबी व 9 फुट रुंदीचा व सुमारे 30 किलो वजनाचा तिरंगा ध्वज डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी कळसुआई शिखरावर मोठया हिंमतीने व धाडसाने पोहचवला .
सकाळी शिखरावर 321 फुट तिरंगा ध्वजाने महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अभिवादन केले . यावेळी जय शिवाजी, जय भवानी , वंदे मातरम, भारत माता की जय, भैरोबाचे नावने चांगभले , जय कळसुआई या घोषणांनी कळसुआईचे शिखर दणाणुन गेले. डोंगर ग्रुपच्या या उपक्रमाचे राज्यातुन आलेल्या पर्यटकांनी कौतुक केले.
या पुर्विही भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सुमारे पन्नास सदस्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलीदानास 350 वर्ष झाल्याबद्दल सुमारे 350 फुट भगव्याची कल्याण दरवाजा मार्गं सिंहगडावर रॅली काढुन शूरवीर नाजी मालुसरे यांना अभिवादन करून भगवी सलामी दिली होती.
भैरवनाथ डोंगर ग्रुपने आतापर्यत राजगड, तोरणागड, रायरेश्वर, रोहीडेश्वर , वासोटा , सिंहगड, हरेश्वर आदी किल्ले सर केले असुन लोणंद येथील भैरवनाथ डोंगरावर सुमारे पन्नास झाडे लाऊन त्याचे गेली तीन वर्ष संगोपन करीत आहेत.
डोंगर ग्रुपच्या आगळया वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.



