Type Here to Get Search Results !

दौंडज येथील डॉ. पतंगराव कदम विद्यालय पुन्हा चैतन्यमय

      
पुरंदर प्रतिनिधी    
 दौंडज (ता.पुरंदर) येथील भारती विद्यापीठाचे  डॉ.पतंगराव कदम विद्यालयात शासन निर्णयानुसार मंगळवार ( दि.२४ नोव्हेंबर ) रोजी  इयत्ता नववी व दहावी चे वर्ग सुरू करण्यात आले  आहेत. यावेळी  शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे फुलांच्या पायघड्या टाकून स्वागत करण्यात आल्याने या विद्यालयात पुन्हा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.     
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पतंगराव कदम विद्यालय जवळपास ८ महिने बंद ठेवण्यात आले होते.या दरम्यान ऑनलाईनचे धडे विद्यार्थ्यांना घरच्याघरी घ्यावे लागले होते .अखेर शासनाच्या आदेशानुसार  शिक्षकांची कोव्हिडं 19 ची तपासणी केल्यानंतरच मंगळवारी(२४नोव्हेंबर) रोजी डॉ. पतंगराव कदम विद्यालय हे सुरू करण्यात आले आहे.             
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीकडून वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण तसेच परिसराची स्वच्छता , वेळापत्रक,पालकांचे संमतीपत्र , सॅनिटायझर ,मास्क ,तसेच सोशल डिस्टनसिंगचा वापर ,आदी सरकारी नियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.तसेच विद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मामिटरव्दारे तपासणी करून त्यांचे स्वागत फुलांच्या पायघड्या टाकून करण्यात आल्याने वातावरण अक्षरशः चैतन्यमय झाले होते .                  
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब गुरव यांच्यासह सहशिक्षक  सुधाकर गोतपागर , सतीश शिंदे ,  भगवान तुपे , दिलीप निंबाळकर ,  जालिंदर घाटे ,अमीन तांबोळी , शोभा काळखैरे , माया कचरे, भगवान जगताप, सुनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test