शिवाजीनगर न्यायालय येथे पुणे लॉयर्स कंझुमर्स को. ऑप. सोसायटीत दिवाळी लक्ष्मी पूजन करण्यात आले. सोसायटीत भारतीय पत्रकार संघाचे(AIJ) जिल्हा अध्यक्ष ऍड.कैलास पठारे पाटील यांनी भेट दिली.
सोसायटीचे चेअरमन ऍड. पांडुरंग ढोरे पाटील व ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष ऍड. फैयाज शेख यांच्या हस्ते ऍड. कैलास पठारे पाटील यांना नवीन वर्ष 2021ची डायरी भेट म्हणून देण्यात आली त्यावेळी सिनिअर ऍड. पांडुरंग थोरवे, सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड कामठे प्रकाश, सेक्रेटरी दादा शेटे, संचालक ऍड. प्रकाश मासाळ, सिनियर एॅड. झंजाड सर. तज्ञ संचालक एॅड मनोहर पवार. ऍड पंडित धुमाळ. ऍड. नाना तिखे, ऍड. राहुल गुंदेचा, ऍड विजय आढाव, एॅड केसवड. ऍड. निवेदिता काळे तसेच सोसायटी चे सर्व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.