नीरा प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली नीरा ग्रामपंचायतीने दिपावलीनिमित्त
कर्मचा-यांना दोन महिन्यांंच्या वेतना इतका बोनस म्हणून दिल्याने ग्रामपंंचायत कर्मचा-यांची दिवाळी गोड झाली आहे .
कोरोना संकटाच्या काळात नीरा ग्रामपंंचायतीच्या कर्मचा-यांनी उत्कृष्ठ काम करून नीरेकरांना चांगली सेवा दिली आहे . याबद्दल कर्मचा-यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानही करण्यात आला आहे. आत्ता दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर नीरा ग्रामपंचायतीच्या ४२ कर्मचा-यांना दोन महिन्यांच्या वेतना इतका बोनस व एक महिन्यांंचे वेतन असे एकूण ६ लाख ८९ हजार ४० रूपये कर्मचा-यांच्या खात्यावर वर्ग करून ग्रामपंंचायत कर्मचा-यांची दिवाळी गोड करण्यात आल्याची माहिती नीरा ग्रामपंंचायतीचे प्रशासक नामदेव गायकवाड व ग्रामसेवक मनोज ढेरे यांनी दिली.
दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचा-यांना बोनस देऊन दिवाळी गोड केल्याबद्दल जेष्ठ लिपिक सचिन ठोंबरे, गणीभाई सय्यद, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रामभाऊ ताकवले यांनी प्रशासक व ग्रामसेवक यांचे आभार मानले.