फोटो ओळी - सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीवरील पुलाच्या साईटपट्ट्यात गवत , माती व कचरा साठलेला आहे.
प्रवाशांसह व नीरेतील नागरिकांचा सवाल
नीरा प्रतिनिधी
पुणे - सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील असलेल्या नीरा नदीवरील मोठ्या पुलाच्या साईटपट्टी व फुटपाथ मध्ये गवत , माती व कचरा साठला असून पुलाच्या दोन्ही बाजुला मोठी झाडे- झुडपे वाढल्याने दुचाकीस्वारांना व पायी चालणाऱ्यांंना अपघाताला निमंत्रण मिळत आहे. दरम्यान, नीरा नदीवरील पुलावरील साईटपट्टयांंची, कच-याची, झाडे झुडपांची स्वच्छता अपघात झाल्यावरच होणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांसह नीरेतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत असलेल्या नीरा नदीवरील मोठ्या पुलावरून साताराहुन नगरकडे जाणाऱ्या अवजड वाहणांची तसेच पुणेहून पंढरपूरकडे जाणारीही मोठी वाहतूक होत असते. दरवर्षी माऊलींंच्या पालखी सोहळ्यादरम्यान या पुलावरील साईटपट्टयांंची स्वच्छता केली जाते तसेच पुलाची रंगसफेदी केली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींचा पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याने नीरा नदीवरील नविन पुलाची स्वच्छता करण्यात आली नाही.
दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे, मुंबई, नगर, नाशिक, औरंगाबाद या सारख्या मोठ्या शहरातून
आपल्या गावी जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी असून हे प्रवाशी जवळचा मार्ग म्हणून नीरा नदीवरील पुलावरून जाात असतात. तसेच नीरा गावातील
बहुसंख्य जेष्ठ नागरिक, महिला , युवक, युवती दररोज सकाळी व संध्याकाळी पाडेगांवकडे फिरण्यास जात असतात. त्यांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून जावे लागत आहे. त्यातच पुलाच्या दोन्ही बाजुला झाडे- झुडपे वाढल्याने दिशादर्शक फलक दिसत नाही. तसेच रात्रीच्या वेळी या पुलावरून जाणा-या नविन अवजड वाहणाच्या चालकाला दिशादर्शक फलक दिसला नाही तर मोठा अपघात होण्याचा संभव आहे. एखादा मोठा अपघात झाला तरच पुुलाची स्वच्छता होणार का? असा संतप्त सवाल प्रवाशी व नागरिक करीत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने नीरा नदीवरील पुलाची स्वच्छता करण्याची पुन्हा जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, लोणंद बाजूने नगर कडे जाणा-या वाहणचालकाला पुल सुरू होण्यापूर्वी पुल संपल्यानंतर कोणत्या मार्गाने नगरकडे जावयाचे हे समजत नसल्यामुळे लोणंद बाजू कडून येणाऱ्या वाहणांसाठी पाडेगांव (ता.खंडाळा) च्या हद्दीत पुणे, नगर, बारामती कडे जाण्याचा मार्ग व किलोमीटर दर्शविणारा फलक लावण्याची मागणी वाहनचालक करीत आहे.