Type Here to Get Search Results !

समाधी मंदिर परिसरात दिपोत्सवाने रोषणाई करत संत सोपानकाका महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न.




पुरंदर प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये असणाऱ्या  संत सोपानकाका महाराज यांचा त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी जन्मदिन असल्याने मोठ्या भक्तिभावाने ऊस्ताहात जन्मदिन साजरा करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराज यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमे दिवशी असल्याने सासवड येथील समाधी मंदिरात पहाटे सोपान काकांच्या समाधिस देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिषेक घालण्यात आला. संत सोपानकाका महाराज यांचा जन्म दिन दिपोत्सव म्हणुन साजरा केला जातो. सकाळी १० ते १२ कालावधीत ह.भ.प.संदिपन महाराज वैद्य यांचे सोपानकाका महाराजांच्या जन्माख्यानावर किर्तन झाले. दरम्यान दुपारी चार वाजता संत सोपानकाका महाराजांच्या समाधीस पोषाख चढवण्यात आला रात्री शेजआरती झाली. संत सोपानकाका महाराज यांच्या मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम देवस्थान ट्रस्ट भाविकांच्या वतीने घेण्यात आले आहे. हे काम पुर्णत्वास नेण्यासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण मंदिरात विद्युत रोषणाई व दिपोत्सव संत सोपानकाका सहकारी बॅंकेच्या माध्यमातून करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test