Type Here to Get Search Results !

कामठवाडी येथील अपघातात दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू

    
पुरंदर तालुका प्रतिनिधी असलम नदाफ

पुणे पंढरपूर महामार्गावर वाल्हे गावच्या हद्दीत कामठवाडी जवळ काल साय. ७ वा.सुमारास जेजुरीहून निरेकडे भरदाव वेगात निघालेल्या शेवरलेट सेल कार ने समोरून येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या दुचाकीस जोरदार ठोस दिली.यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोन जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल ( दि.२७ नोव्हेंबर ) साय.७ वा.सुमारास ऊसतोड कामगार आदिनाथ विक्रम सोनवणे ( रा.चकलांबा ता.गेवराई ) गजानन भाऊसाहेब थोरे ( रा.केकत जळगाव ता.पैठण ) व बाळू भानुदास सानप ( रा.चकलांबा ता.गेवराई जि.बीड ) हे तिघे आपल्या मोटार सायकल ( क्र.एम.एच.१२/ बी.ई.२५४३ ) वरून निरेहून जेजुरीच्या दिशेने जात होते.त्यावेळी कामठवाडी जवळ करंज नाला येथील स्मशानभूमी समोर, जेजुरीहून येणाऱ्या शेवरलेट सेल कार ( क्र.एम.एच.९ /डी.एक्स.८०५३ ) ने त्यांच्या दुचाकीस जोरदार ठोस दिली.यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीररित्या जखमी झाले.या दरम्यान जखमींना पुढील उपचारार्थी जेजुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता आदिनाथ सोनवणे व गजानन थोरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर बाळू सानप यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघाताची खबर अशोक शांताराम बडे यांनी जेजुरी पोलीस ठाण्याला दिली.त्यानुसार पोलिसांनी कार चालक श्रीकांत मारुती नाईक ( वय ५१ रा.अंबप वाडी,ता.हातकंगले ) याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस चौकीचे हवालदार केशव जगताप हे करित आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test