वाल्हे प्रतिनिधी सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यातील कृषी प्रधान भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडकी येथून एक वृद्ध महिला राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेची खबर संग्राम गजानन शिंदे (वय २३ रा.मांडकी ,बोरीशेत वस्ती ) यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली आहे.
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कलावती कृष्णा गाडेकर ( वय ७५ ) असे बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.तिची उंची साधारण ५ फुट रंग सावळा,सडपातळ बांधा, केस पांढरे ,अंगात लाल रंगाचा परकर व पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट परिधान केला असल्याचे वर्णनात नमूद करण्यात आले आहे .
याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास वाल्हे पोलीस चौकीच्या ०२११५,२८४१३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार के.आर जगताप यांसह समीर हिरगुडे हे करित आहेत.