सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर अंतर्गत करंजेपुल दुरक्षेत्र पोलिस उप निरीक्षक पदी योगेश शेलार यांची वर्णी लागली असून या अगोदर शेलार यांची एमपीएससी मधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले असून गडचिरोली परिक्षेत्र येथे साडेतीन वर्ष त्यांनी सेवा बजावली आहे.. त्याठिकाणी आंतरिक सेवा पदक त्यांनी भूषवलेले आहे . त्यानंतर सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथक अधिकारी म्हणून काम केले होते, तसेच बारामती शहर पोलीस ठाण्यात गुंडा पथक अधिकारी म्हणून गेले दोन वर्ष सेवा बजावत असताना विशेष सेवा पदक सिंगम स्वरूप पद भूषवलेली होते तसेच बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र मध्ये उपनिरीक्षक म्हणून आलेले योगेश शेलार बोलताना म्हणाले की बारामतीच्या पश्चिम भागातील सोमेश्वरनगर परिसर सोमेश्वरकारखानामूळे उद्योजक नगरी झाली आहे व शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी शाळा कॉलेज ही मोठया प्रमाणात आहेत.
वडगांव निंबाळकर पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल-सोमेश्वरनगर मध्ये जातीय सलोखा राखणे , अवैद्य धंद्यांवर धडक कारवाई,गुन्हेगारी यावर मी नक्कीच नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील आसेल.