Type Here to Get Search Results !

भारतीय राजदूतातील कौन्सिल जनरल मिशीहो हाराडा यांची बारामतीला भेट


बारामती प्रतिनिधी दिगंबर पडकर

कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी द्राक्षाची शेती शेतकऱ्यांनी करावी अशी अपेक्षा जपानच्या भारतीय राजदूतातील कौन्सिल जनरल मिशीहो हाराडा यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील बैठकीत व्यक्त केली. यावेळी द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, डॉ संतोष भोसले, विवेक भोईटे यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरुन हाराडा हे बारामतीत आले होते. आज सकाळी त्यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.व भरभरून कौतुक केले. पाहणी नंतर झालेल्या बैठकीत 
मिशिहो  हाराडा यांनी सांगितले की, जपानमधील ओकायामा या शहरासोबत पुणे शहराचे आदानप्रदान आहे. जपानमधील ओसाका ते हिरोशीमा या पट्टयात द्राक्षाची उत्तम शेती केली जाते. जपानमध्ये द्राक्षाला भावही चांगला मिळतो. शरद पवार यांच्याशी जेव्हा भेट झाली, तेव्हा त्यांना मी ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी मला बारामतीला भेट देण्याचे  निमंत्रण दिले होते.
त्यानुसार या भागातील द्राक्ष शेतीची मी पाहणी केली.जपानमध्ये उत्तम प्रतीच्या मस्कत द्राक्षाला प्रतिकिलो साठ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास साडेचार हजार रुपये इतका भाव मिळतो. बारामती इंदापूर तालुक्यातील द्राक्षांची प्रत उत्तम असून त्यांची निर्यात करण्यासोबतच जपानमधील उच्च तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना माहिती व्हावे, त्याचा वापर त्यांनी भारतात द्राक्षनिर्मिती करताना व्हावा, असा शरद पवार यांचा उद्देश आहे.यावेळी हाराडा म्हणाले की, भारतातील मेट्रोसह मुंबईतील समुद्रातील मुंबई ते नवीमुंबई फुल उभारणीसाठी जपान सरकारचे सहकार्य मिळाले आहे. तसेच सध्याच्या कोरोना काळातही भारत सरकारला जपानने ३५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जपानमध्येही एक शरद पवार हवेत.....

ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात 93 साली खिलारी येथे भूकंप झाला होता. त्यावेळी पवार यांनी नियोजनबद्ध यशस्वी परिस्थिती हाताळली होती. व या घटनेनंतर भविष्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती वेळी तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने एन.डी.आर.एफ.सी ची स्थापना केली होती. जपान हा भूकंपाचा प्रदेश आहे. या भागात शरद पवार यांच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे असे हाराडा म्हणाले.


.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test