Type Here to Get Search Results !

बारामतीत सदनिका फोडून एक लाख २६ हजार ८०१ रुपयांचा मुद्देमाल लंपास


बारामती प्रतिनिधी

बारामती शहरात सदनिका फोडून एका अज्ञात चोरट्याने चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत राजश्री भारत सोनवणे (वय ३८ ) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


बारामती शहरातील सायली हील येथील अवनीश अपार्टमेंट मधील एका अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील मास्टर बेडमधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून २९ हजार 80 रुपयांचे ८ ग्रॅम कानातील झुमके, ५२ हजार ७२१ रुपयांचेे १४ ग्रॅम ५८० वजनाची गळयातील सोन्याची चेन व ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख २६ हजार ८०१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्यादीत म्हटले आहे.


सदरची घटना काल दिनांक ६ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार सोननीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test