नीरा प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा बीटमधील प्राथमिक
शिक्षकांनी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१७) एकत्र येत 'एक दिया शहीदोंके नाम , एक दिवा शहीदांच्या स्मृती साठी ' या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी नीरा बीटचे केंद्रप्रमुख सुरेश लांघी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारत देश स्वतंत्र झाल्यापासुन आपले वीर जवान शत्रूंंशी, आतंकवाद्यांशी सामना करीत आहे .
सीमेवर देशाचे संरक्षण करीत लढा देत आहेत.
सन २०२० या काळात चीन , पाकिस्तानमधील आतंकवाद्यांशी लढताना वीर जवानांनी प्राणाची आहुती दिली . तसेच ,कोरोना काळातही कोरोना योद्ध्यांनी देशासाठी प्राण दिले आहेत . तसेच दिवाळी काळातही आपण आनंदोत्सव साजरा करीत असताना सीमेवर आपले सैनिक शत्रूंंना अद्दल घडवित आहेत , आपल्यासाठी प्राणांचे बलिदान देत आहेत अशा सर्वांसाठी " एक दिया शहिदोंके नाम " एक दिवा त्यांच्या स्मृती साठी ' हा उपक्रम गेली पाच वर्षांपासून भाऊबीजे दिवशी नीरा बीटमधील शिक्षक राबवित आहेत.
नीरा नदीकाठावरील प्रसिद्ध दत्तमंदीरात मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नीरा बीटमधील शिक्षकांनी
एकत्र येऊन सामाजिक अंतराचे पालन करीत 'ए मेरे वतन के लोगो ,जरा आंखों मे भरलो पाणी ,जो शहीद हुए है उनकि जरा याद करो कुरबानी ! जय हिंद ! या शहीदांच्या आठवणी जाग्या करीत दिप लावून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी दत्तघाट परिसर उजळून निघाला होता.