वडगांव निंबाळकर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील दहाफाटा, सदोबाची वाडी येथे टर्निंग पाँईंट वेलनेस सेंटर व हर्बल हेल्थ सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे संचालक सिद्धार्थ गिते, चेअरमन सोमनाथ होळकर, दिपक होळकर, बाबासो भिसे, कमलाकर कारंडे,पत्रकार चिंतामणी क्षिरसागर, अमोल नवत्रे, आकाश नवत्रे, वरुटे सर, आगवणे सर भाग्येश सर, सौ.जयश्री होळकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलतांना टर्निंग पाँईंट वेलनेस सेंटरच्या सारीका नवत्रे म्हणाल्या की माणूस आजारी पडल्यानंतर दवाखाणन्यात जातो, पण आपन आजारीच पडू नये म्हणून आपण काय केले पाहीजे. या विषयावर बोलत असतांनाच आपल्या परिसरातील लोकांचे आरोग्य सुधरावे, त्याना जवळच आरोग्याविषयी माहीती उपलब्ध व्हावी म्हणून हे सेंटर चालू करत असल्याचे सांगीतले. उपस्थितांचे मंगेश वाघ व संकेत होळकर यांनी आभार मानले.