कळंब/ इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
मौजे रेडणी ( ता. इंदापूर ) येथे "कोव्हिड 19" या साथ रोग काळात "कोविड योध्दा" म्हणून सक्षम काम केल्याबद्दल रेडणी गावचे पोलीस पाटील महेंद्र पडळकर यांचा इंदापूर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरेसाहेब , सहा.पोलीस निरीक्षक अजित जाधव , सहा. पोलीस निरीक्षक दाजी देठे , व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
इंदापूर पोलीस ठाण्यात तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता , त्यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते .
रेडणी गावचे पोलीस पाटील यांनी या गावात कोरोना साथरोग काळात महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे .



