पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बारामती
तालुक्यात पुरुष पत्रकार बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आली. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच बचत गट आहे. या गटात
एकूण वीस पत्रकार सभासद सहभागी आहेत. मुंबई मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे बारामती तालुक्यात ४० सभासद आहेत. विविध गावांतील पत्रकारिता करणारे सभासद या निमित्ताने एकत्र आले आहेत. सध्या राज्यात शेतकरी, महिला यांचे
बचतगट कार्यान्वित आहेत, परंतु पत्रकारांचा मात्र एकही गट स्थापन करण्यात आला नव्हता. याच पार्श्वभूमीवर या सभासदांनी एकत्र येऊन बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे.या उपक्रमाचे अनेक जाणकार लोकांनी कौतुक केले, अशी माहिती पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर तावरे यांनी दिली.



