बारामती प्रतिनिधी
बारामती शहर व परीसरात विविध ठिकाणी आठ घरफोडी करून सोन्या -चांदीचे दागिने इतर साथीदाराच्या मदतीने लुटणारा आरोपी जेरबंद करण्यात बारामती शहर पोलासांना यश आले आहे.
त्याच्याकडून चोरीतील २ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेरड्या उर्फ
नियोजन संदीप भोसले (वय २८, रा. सोनगाव, ता. बारामती), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे
नाव आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये चंदन चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असताना हा आरोपी मळद हद्दीत चंदनाची झाडे चोरण्यासाठी रेखी करीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून
कुन्हाड, करवत, लोखंडी गिरमिटअसे साहित्य जप्त करीत अटक केली. साथीदार गांगुली भोसले व इतर साथीदारांसह बारामती शहर परिसरात एकूण ८ घरफोड्या केल्याची कबुली आरोपीने दिली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिसांनी केली.