वडगांव प्रतिनीधी
होळ (ता. बारामती) येथे बाळासाहेब कर्चे यांनी सोशल मीडिया वरील निवडक लेखांचा संग्रह करुन त्याचे "शब्दशिवार" हे विविध लेखांंचे संकलन असलेले पुस्तक होळ या ठिकाणी राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते प्रकाशित केले. कोरोनाच्या बंद काळात त्यांनी प्रकाशित केलेले हे दूसरे पुस्तक आहे. पुस्तक प्रकाशनावेळी बोलतांना बाळासाहेब कर्चे यांनी सांगीतले की सोशल मिडियावर येना-या ब-याचशा पोस्ट या अतिशय उत्तम असतात,मात्र काही कालावधीनंतर या पोस्ट सापडणे अवघड होऊन बसते कींवा आपल्या मोबाईल मधून डीलीट होतात. तसेच ह्या सोशल मिडियावरुन येनारे लेख ज्येष्ठ लोकांपर्यंत पोहचत नाहीत कारण बरेचशे जेष्ठ लोक सोशल मिडिया वापरत नाहीत. या सर्वांपर्यंत हे लेख पोहचावेत व वाचण्यासाठी सहज उपलब्ध व्हावेत यासाठी या लेखांचा संग्रह करुन हे "शब्दशिवार" पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले. या पुस्तकाचे संकलक बाळासाहेब कर्चे हे होळ तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत आहेत.भाग्यलक्ष्मी प्रकाशनचे सागर वायाळ हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. या पुस्तक प्रकाशनासाठी वडगांव निंबाळकर चे सर्कल अधिकारी संजय माने, सोमेश्वर सह.साखर कारखाण्याचे संचालक सिद्धार्थ गिते, तलाठी भाउसाहेब अरुण होळकर, राहुल कोल्हे,दादासाहेब आगम, मधुकर खोमणे,जेष्ठ लेखक फुले सर, पत्रकार विनोद गोलांडे, निखिल नाटकर, ग्रामस्थ कमलाकर कारंडे,सारीका नवत्रे, ग्रामसेविका सौ. गायकवाड, आकाश आढाव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार चिंतामणी क्षिरसागर यांनी केले तर आभार तलाठी ए.एच.ईनामदार यांनी मानले.



