इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
मौजे रेडणी (ता इंदापूर)या ठिकाणी "नामदार चषक"या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 'बिग-बी'या ग्रुप ने केले आहे.त्या हाप स्पीच टेनिस बॉल स्पर्धेचा उदघाटन समारंभ संपन्न झाला.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे"तालुका अध्यक्ष" हनुमंतराव कोकाटे यांच्या हस्ते व राज्याचे माजी संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू समर्थक व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सामन्याचे उदघाटन झाले.
इंदापूर,बारामती, करमाळा, माढा, माळशिरस, फलटण, या तालुक्यातून विविध संघाचे खेळाडुनी उपस्थित राहत संघाची नोंदणी केली,या स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील तरुण खेळाडूंचा सहभाग मोठया प्रमाणावर होता.
इंदापुरातील या दोन राजकिय मातब्बरांना या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी एकत्र आणून कमालीची उत्सुकता या प्रसंगी निर्माण केली होती, या दोन विविध टोकाच्या विचारसरणीचे व वेगवेगळ्या पक्षाचे ह्या दोन शिलेदारांची "दमदार एन्ट्री"मैदानावर होताच तरुण युवकात उदघाटन कोणत्या स्टाईल ने होणार याची उत्सुकता निर्माण झाली,या दोघा
राजकीय मातब्बरानी आप आपल्या स्टाईलने उपस्थित युवा खेळाडूंची विचारपूस करीता 'सामना'खेळण्यास शुभेच्छा दिल्या.
या सामन्याचे उदघटनास्थळी युवकांच्या आग्रहखातर राजकिय मैदान सोडून या क्रिकेट प्रेमीच्या मैदानावर प्रत्यक्ष खेळावे ही विनंती मान्य करीत खेळण्यास सुरुवात केली.
फलंदाजी व गोलंदाजी कोणी करायची किंवा कोणाकडे द्यावयाची याचा 'राजकिय गुंता' संयोजकांना पडला,पण ही गूणतागुंत हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या लक्षात येताच त्यांनी चेंडू स्वतःच्या हातात घेताच 'फलंदाजी'करण्याच्या सूचक इशारा उपस्थितांना दिला,हा 'राजकिय इशारा' राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांच्या लक्षात येताच 'हंम भी कुछ काम नही'असी सुचकता दाखवत "बॅट"हातात घेत फलंदाजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा संकेत दिला.हा राजकीय जुगलबंदीचा 'खेळ'युवकांना पहावयास मिळाल्याने या दोघांचा "मैदानावरील सामना' पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली.
या दोघांतील खेळामधील राजकिय कौशल्य पाहण्यासाठी सर्व युवा खेळाडू मैदानात उतरले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून "क्रिकेटच्या स्पीचवर"आले.हनुमंत
कोकाटे हे फलंदाजी करण्यास तर श्रीमंत ढोले गोलंदाजी करण्यास स्पीचवर आले .
गोलंदाजी च्या माध्यमातून 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाची "विकेट" घ्यायची व फलंदाजी च्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्या चेंडूवर "रन"काढायची ही या दोघांनी खेळी खेळली होती,पण प्रत्यक्षात कोकाटे यांनी स्वतःचे कौशल्य दाखवीत 'विकेट' पडू दिली नाही तर ढोले यांनी त्यांना 'रन'ही काढू दिली नाही
या दोघांच्याही "राजकिय खेळीचा"अनुभव सर्व युवक खेळाडूंनी घेतला.या बाबत या दोघांचा फलंदाजी व गोलंदाजी करीत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला, त्याची जोरदार चर्चा इंदापूर तालुक्यात आहे,
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, दत्तात्रय भिसे,यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूच्या स्पर्धा कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सचिन तरंगे,शहाजी तरंगे,सुनील खाडे, वैजनाथ तरंगे,मोहन खाडे, युवा कार्यकर्ते अमोल मूळे, सुरेश खाडे, पोपट चव्हाण, व सर्व संयोजक उपस्थित होते.



