बारामती प्रतिनिधी
चंदन चोरी प्रकरणी आरोपीचा शोध सुरू असताना बारामती तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत एक संशयित चंदनाच्या झाडांची रेकी करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडे अधिक चौकशी केली.असता त्याने बारामती शहर व परिसरात ७ ते ८ घरफोड-या केल्याची कबुली दिली आहे. बेरडया उर्फ नियोजन संदीप भोसले (वय.२८.रा.सोनगाव ता.बारामती) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.बारामती परिसरात ८ घरफोड्या करून चोरीला गेलेले २ लाख ६२ हजार रुपये किमंतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
मोबाईल चोर अटकेत....
बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेतील मोबाईल दुरुस्तीचे दुकान फोडून ३ लाख ४४ हजार ३३३ रुपये किमंतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ४१ मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद ११ नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी बालाजी उर्फ बाल्या, अनिल माने रा.कैकाडी,गल्ली ता.बारामती यास अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचे साथीदार आतिफ नजामुद्दिन तांबोळी रा.चिमणशहामळा बारामती,साहिल अय्याज शकीलकर रा.जामदार रोड कसबा.बारामती, प्रतीक दिलीप रेडे रा.बाबर गल्ली बारामती,अनिकेत गायकवाड रा.बारामती, सलमान बागवान रा.कचेरी रोड बारामती, असल्याचे सांगितले व दोन अल्पवयीन मुले यांनी मिळून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. पैकी आरोपी क्रमांक ३,६ व ७ अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे...
चंदनाची चोरी करणारे आरोपी जेरबंद....
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांदुळवाडी रोड येथील सावंत विश्व बंगल्यासमोरील एका चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सदर गुन्ह्यातील आरोपी बाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सचिन नवनाथ शिंदे (वय,३४) रा.माळेगाव बुद्रुक ता.बारामती.यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले २ हजार रुपये किमंतीची दोन चंदनाची लाकडी ओंडके व गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण ८ लाख ३ हजार रुपये किमतीचा माल पोलिसांनी उघडकीस आणला आहे
चोरून गांजा विक्री करणा-यावर पोलिसांची कारवाई...
बारामती शहरातील समर्थनगर येथे चोरून गांजा विक्री होत होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता अमित अनिल धेंडे (वय ३७) रा.आमराई. त्याच्याकडून १२ हजार २०० रुपये किमतीचा ६१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
बुलेट चोरणारा गजाआड...
बारामती शहरातील भिगवण रोड येथून एक इसम चोरीची बुलेट घेऊन येत आहे.अशी गोपनीय माहिती बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली.या माहितीवरून स्थानिक गुन्हे शोध पथकाने कसबा येथे एका इसमाला शिताफीने बुलेटसह ताब्यात घेतले.त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.सदर गाडीच्या चासी व इंजिननंबर पाहिला असता सदर गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. व त्या गाडी बाबत नाशिक जिल्ह्यातील पंचवटी पोलीस ठाण्यात गाडी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.