Type Here to Get Search Results !

८ डिसेंबर २०२० रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत


 
बारामती प्रतिनिधी

मा. जिल्हाधिकारी , पुणे यांचेकडील पत्रानुसार सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. यानुसार दिनांक 8 डिसेंबर 2020 ही तारीख सरपंच आरक्षण सोडतीसाठी निश्चित करण्यात आली आहे.या आरक्षण सोडतीचे वेळी काढलेले आरक्षण हे सन 2020 - 25 या मुदतीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी लागू राहणार आहे.

            बारामती तालुक्यासाठीची आरक्षण सोडत दिनांक  8 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह , बारामती येथे तहसिलदार बारामती यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे , आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test