Type Here to Get Search Results !

सोमेश्वरच्या आजी-माजी सैनिकांच्या वतीने सैनिक महाउद्योग कंपनीची स्थापना


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील आजी-माजी सैनिकांकडून सैनिक महाउद्योग कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. वाणेवाडी (ता. बारामती) येथे या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक विशाल गायकवाड, तालुका क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे पोलिस
अधिकारी सोमनाथ लांडे, रमाकांत गायकवाड,
बाळासाहेब शेंडकर, ॲड. गणेश आळंदीकर
उपस्थित होते. परिसरातील सुमारे ३७ सैनिकांनी
एकत्र येत व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्रित येऊन सैनिक महाउद्योग कंपनी स्थापन केली आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात फूड सेक्टरमधील १० ते १५ वस्तू, तसेच मसाले, लोणचे, चटण्या आणि इतर साहित्य निर्माण करण्याचा मानस आहे. शेतकरी कंपनी स्थापन करणे, स्थावर
मालमत्ता, शेती या क्षेत्रातदेखील सैनिक महाउद्योग
पदार्पण करणार आहे. या माध्यमातून देशातील
सैनिकांना रोजगारनिर्मितीचे माध्यम निर्माण करणे,
सर्व देशातील सैनिकांना यात सामील करून नेटवर्क
वाढवणे असा उद्देश असल्याची माहिती अनिल
शिंदे यांनी दिली. प्रा. पी. एम. गायकवाड यांनी
सुत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test