Type Here to Get Search Results !

पिकांना रासायनिक खते देण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन


इंदापूर तालुका प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा ,अंतर्गत रेडणी तालुका इंदापूर येथे ग्रामीण कृषी जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रासायनिक खते कोणती वापरावीत आणि किती प्रमाणात वापरावीत तसेच पिकांच्या वेळेनुसार केव्हा वापरावीत या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर  डॉ पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठ  अकोला,संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा ,येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी गणेश हरिचंद्र काळे ,यांनी रासायनिक खते आणि त्यांच्या वापराबद्दल माहिती सांगितली . 

यावेळी पिकांना होणारा फायदा आणि रासायनिक खते वेळेवर वापरल्यास उत्पादनात अधिक वाढ होते. असे सांगण्यात आले सदर प्रात्यक्षिकांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, प्रा. राजपूत सर , प्रा. देशमाने सर, यांचे योग्य मार्गदर्शन लाभले यावेळी कृषिदूत गणेश हरिचंद्र काळे आणि शेतकरी सचिन तरंगे सर, रणजीत तरंगे,विठ्ठल काळे, राहुल तरंगे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test