प्रतापगडाच्या रणसंग्रामात ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले, आणिआपल्या वतनावर पाणी सोडले, असे कान्होजी नाईक जेधे. जय भवानी जय शिवाजी हा मंत्र ज्यांनी मराठी मुलखाला दिला ते कान्होजी नाईक जेधे पुत्र बाजी नाईक जेधे ज्यांना शिवरायांनी सर्जेराव हा किताब दिला.यांचे १४वे वंशज रानधीर बाळासाहेब जेधे यानी सोमेश्वर कारखान्याला भेट देत कार्यकारी संचालक व पत्रकाराशी संवाद साधला.
रायरेश्वराच्या पायथ्याशी कारी ता:भोेर गावामध्ये कान्हजी जेधे यांचे स्मारक असुन त्यासाठी शासनाने ७६ लाख रुपये खर्च करत वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले असल्याची माहिती रनधीर जेधे यांनी दिली आहे. येथे दर वर्ष जिल्हा प्रशानाकडुन जेधे यांची जंयती साजरी केले जाते.
कान्होजी जेधे यांच्या वर नुकत्याच प्रकाशित झालेल्या स्वराज्य निष्ठेचे प्रतिक कान्होजी जेधे या पुस्तकाची प्रत खासदार शरद पवार यांना भेट देउन येत असताना सोमेश्वर कारखान्यावर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याशी संवाद साधण्यासाठी ते थांबले होते .
यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे ,ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप युवराज खोमणे, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ उपस्थित होते